मुंबई

Rohit Pawar : हाणामारी विधानभवनात… ठिय्या मध्यरात्री पोलीस ठाण्यात!

•”हातवारे करू नका… आमदाराला हात लावायचा नाही!” – मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार भडकले

मुंबई | महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राजकारण शाब्दिक पातळीवरून थेट हातघाईच्या वळणावर पोहोचले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर रात्रीतून वातावरण चांगलेच तापले.

गुरुवारी झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. याचदरम्यान आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मध्यरात्री 12 वाजता विधानभवनातून अटक करण्यात आली. त्याचा निषेध करत आव्हाड व आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी पोलिसांवर थेट शब्दांचे बाण सोडले.“हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. आमदाराला हात लावायचा नाही,”असं स्पष्टपणे सांगताना रोहित पवार संतप्त स्वरात दिसून आले.याचवेळी कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दबाव टाकत “साहेबांना हात लावायचा नाही”, असं जोरदार विरोध दर्शवला.

आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया – “फसवलं आम्हाला”

जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या अध्यक्षांवर नाराजी व्यक्त करत म्हटलं:“अध्यक्षांनी आश्वासन दिलं होतं की नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला. जो कार्यकर्ता मार खातो त्याला पोलिस उचलतात, आणि गुन्हेगार पसार होतात – हा कुठला न्याय?”रोहित पवारांनीही पूर्ण पाठिंबा जाहीर करत कार्यकर्त्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0