Rohit Pawar : पावसाळी अधिवेशनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 19 आमदार पक्ष पुन्हा पक्षात येईल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचा मोठा दावा
Rohit Pawar News : 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विधानसभेच्या 54 जागा जिंकल्या होत्या. जुलै 2023 मध्ये पक्ष फुटला तेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने सुमारे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार असून 12 जुलै रोजी संपणार आहे.
मुंबई :- राज्य विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादीचे 18 ते 19 आमदार त्यांच्या बाजूने येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आहेत जे जुलै 2023 मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे शरद पवार आणि इतर ज्येष्ठ नेत्यांविरोधात कधीही चुकीचे बोलले नाहीत.
पावसाळी अधिवेशनानंतर परिस्थिती बदलेल
राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार म्हणाले की, पण त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात हजर राहून त्यांच्या मतदारसंघासाठी विकास निधी मिळवायचा आहे. त्यामुळे ते अधिवेशन संपेपर्यंत वाट पाहतील. राष्ट्रवादीचे 18 ते 19 आमदार आमच्या आणि पवार साहेबांच्या संपर्कात असून, पावसाळी अधिवेशनानंतर ते त्यांच्याकडे येतील.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या होत्या. जुलै 2023 मध्ये पक्ष फुटला तेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने सुमारे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार असून 12 जुलै रोजी संपणार आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असेल.