Rohit Arya Latest News : गुजरातमध्ये मोदींच्या हस्ते प्रकल्पाला सुरुवात झाल्याचा दावा; माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी वैयक्तिक मदत केल्याची माहिती
मुंबई :- मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवून स्वतः एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या रोहित आर्या Rohit Arya Encounter याच्या कृत्यामागे आर्थिक आणि शासकीय वाद असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा प्रकल्पात ‘स्वच्छता मॉनिटर’ ही संकल्पना आपलीच असल्याचा दावा रोहित आर्याने केला होता. राज्यातील शाळांमध्ये हा प्रकल्प स्वखर्चाने राबवल्याची रक्कम शासनाकडून न मिळाल्याच्या रागातून त्याने हे घृणास्पद कृत्य केले.
रोहित आर्या हा स्वतःला स्वच्छता अभियानाचा प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणवत असे. त्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित ‘लेट्स चेंज’ नावाचा लघुपट बनवला होता. त्यांनी दावा केला होता की, 2013 मध्ये गुजरातमध्ये त्याची मोहीम त्यांनी सुरू केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संकल्पना आवडल्याने त्यांनी तो राबवण्याचे आदेश दिले होते. शालेय विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करावे, अशी त्यांची ‘स्वच्छता मॉनिटर’ संकल्पना होती.
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान सुरू झाल्यानंतर रोहित आर्याने ही संकल्पना शिक्षण विभागासमोर ठेवली. रोहित आर्या यांच्या दाव्यानुसार, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले होते की, त्यांनी 2022 मध्ये राज्यातील शाळांमध्ये ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प’ सुरुवातीला स्वखर्चाने राबवावा आणि नंतर शिक्षण विभाग त्याची रक्कम देईल. या प्रकल्पामुळे शाळांचा परिसर स्वच्छ झाल्यानंतर शिक्षण विभागाने त्याची दखल घेऊन शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य केले होते. या प्रकल्पासाठी विभागाने दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती, मात्र प्रत्यक्षात रक्कम मिळाली नाही, अशी आर्या यांची तक्रार होती.
रक्कम न मिळाल्याने रोहित आर्या गेल्या वर्षीपासून आंदोलन करत होते. मे 2024 मध्ये त्यांनी उपोषण केले होते आणि त्यानंतर 29 सप्टेंबर 2024 रोजी त्यांनी दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोरही आंदोलन केले होते. अधिकारी जानेवारी 2024 पासून प्रकल्पाची रक्कम देत नसल्याची त्यांची तक्रार होती. रोहित आर्या यांनी गेल्या वर्षी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मंत्री दीपक केसरकर यांनी वैयक्तिक पातळीवर साधारण 15 लाख रुपये देऊन त्यांना मदत केली होती. रोहित आर्या यांनी ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमाच्या निकालावरही आक्षेप घेतला होता. त्या अभियानात राजकीय नेत्यांच्या शाळांनाच पारितोषिके देण्यात आली होती, अशी त्यांची तक्रार होती.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…