ठाणे

खुनाचा प्रयत्न करून दरोडा: वसईत थरार! घरात घुसून चाकूचा धाक दाखवत 12 तोळे सोने लुटले; 3 आरोपी कर्नाटकातून जेरबंद!

Vasai Latest Crime News : 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; गुन्हे शाखेच्या ‘कौशल्यपूर्ण’ तपासाला यश!

वसई :- वसई परिसरात काही दिवसांपूर्वी खुनाचा प्रयत्न करून दरोडा टाकल्याची एक गंभीर घटना घडली होती. वालीव पोलीस ठाण्याच्या Valiav police Station हद्दीतील सातीयली, दामुपाडा येथील रिलायबल ग्लोरी इमारतीत 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी गीता चित्रसेन राऊत या त्यांच्या मुलासोबत घरी असताना, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. Vasai Latest Crime News

आरोपींनी राऊत आणि त्यांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून ‘सोने कुठे आहे?’ अशी विचारणा केली. सोन्याबद्दल माहिती देण्यास नकार दिल्यावर आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या अंगावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. सुदैवाने तो वार चुकल्यामुळे फिर्यादी किरकोळ जखमी झाल्या, परंतु त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली.

12 तोळे सोने आणि मोबाईलची चोरी

या दरोड्यादरम्यान आरोपींनी घरातील कपाटातून 12 तोळे सोन्याचे दागिने आणि एका विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज जबरीने चोरून नेला होता. या घटनेनंतर वालीव पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेने कर्नाटकातून आरोपींना पकडले

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखा- कक्ष 2, वसई येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाचा आणि आजूबाजूच्या परिसराचा कौशल्यपूर्ण तपास करून तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून आरोपींची ओळख पटवण्यात आली. आरोपी हे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्यातील नंदगाय येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस पथकाने तात्काळ कर्नाटक गाठून 20 नोव्हेंबर 2025 रोजी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

8 तोळे सोने जप्त: 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीस गेलेल्या दागिन्यांमधील 8 तोळे सोन्याचे दागिने तसेच त्यांच्या अंगझडतीतून मिळालेली रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे

1.अशोक उर्फ बाबू राजू शिंदे (रा. शांतीनगर डोंगरी पाडा, वसई पूर्व)

2.अब्दुल रऊफ हाशमी (रा. रिचड कंपाऊंड मनिचा पाडा, वसई पूर्व)

3.रितीक रयी बेलंगी (रा. रिचड कंपाऊंड मनिचा पाडा, वसई पूर्व)

या आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांचे आणखी 3 साथीदार (नूर हसन खान, सुरज किशोर जाधव आणि काळु प्रभाकर साहु) असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे.

ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा-2 वसई युनीटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि त्यांच्या पथकाने, पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठपणे पार पाडली आहे. पुढील कारवाईसाठी तिन्ही आरोपींना वालीव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

vivek

Recent Posts