गरीब गरजू लोकांना फराळ वाटून रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूटने साजरा केला दिवाळी सण
आनंदाची दिवाळी दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक, दिवाळी ओळखली जाते ती मेजवानीने,फटाक्याच्या रोषणायीने आणि रंगीबेरंगी रांगोळीने. दिवाळीत माणसं एकत्र भेटतात, एकमेकांना हस्तादोलन करतात आणि लाडू शंकरपाळी गोडदोड खात दिवाळीचा सण साजरा करतात. आणि अगदी तसाच सण साजरा केला तो म्हणजे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूटने किंबहुना एक पाहुल पुढे जात विंदाच्या भाषेत म्हणायचं तर देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे.” म्हणजे काय तर उपकार अजिबात नाही या उलट देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणाऱ्याचा दानशुरपणा आपण आपल्या अंगी बाणावा आणि समाज म्हणून कासवाच्या गतीने का होईना जितकं आपण निसर्गाकडून घेतोय त्याचा खारीचा वाटा का होईना ते परत करण्याचा प्रयत्न असावा इतकंच आणि म्हणूनचं हि आनंदाची दिवाळी साजरी करण्याचा खटाटोप. आपणा सर्वांना रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूट परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ..!