Remo D’Souza : कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीसह 7 जणांविरुद्ध एफआयआर, 11 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा
•FIR Against Remo D’Souza And Wife Lizelle प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्या अडचणी वाढू शकतात. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेमोसह 7 जणांनी 11.96 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
PTI :- Remo D’Souza सह 7 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तो एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे आणि अनेक डान्स रिॲलिटी शोज जज करतो. आता त्याच्यावर एका डान्स ग्रुपसोबत 11.96 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Remo D’Souza, त्याची पत्नी लीझेल आणि इतर पाच जणांविरुद्ध 16 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 19 ऑक्टोबरला याबाबत माहिती दिली. 26 वर्षीय डान्सरने त्याच्याविरुद्ध मीरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Remo D’Souza आणि त्याच्या पत्नीशिवाय इतर पाच जणांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. ओमप्रकाश शंकर चौहान, रोहित जाधव, विनोद राऊत आणि रमेश गुप्ता अशी उर्वरित चार जणांची नावे आहेत.
एफआयआरनुसार, ज्या व्यक्तीने Remo D’Souza आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे, त्याने 2018 ते 2024 या काळात फसवणूक केल्याचा आरोप आहे. या ग्रुपने एका टीव्ही डान्स शोमध्ये परफॉर्म केले होते आणि ते जिंकले होते, असेही वृत्त आहे. त्याचे पैसे न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. रेमोचे नाव अशा वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे 8 वर्षांपूर्वीही त्याच्यावर 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.तक्रारदाराने त्यांच्यावर आरोप केला होता की चित्रपट बनवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून 5 कोटी रुपये घेण्यात आले आणि 10 कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याला पैसे परत मिळाले नाहीत. ऑगस्ट 2024 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. रेमोने दिलासा देण्याची मागणी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती.