मुंबई

CM Eknath Shinde : “निर्धार ग्रामीण विकास” माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्धार ग्रामीण विकासाच्या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई :- सरकारचा पावसाळी अधिवेशनाचा Maharashtra Monsson Session आजचा शेवटचा दिवस होता. या अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाच्या योजन सर्वसामान्य पर्यंत पोहोचावे याकरिता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून विविध उपयोजना केले जातात. बहुचर्चित मुख्यमंत्री लाडली बहिण योजना प्रत्येक घरात पोहोचावे यासाठी शिंदे सरकारने कंबर कसली आहे. दोन ते तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी सरकारच्या योजना आणि सरकारने केलेली कामगिरी सर्वसामान्य जनतेपर्यंत जास्त कडून ग्रामीण भागात पोहोचावे याकरिता शिंदे सरकारकडून विविध योजनांचे पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे.

‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधानभवनात प्रकाशन करण्यात आले. गावातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामविकास विभाग काम करीत आहे. ग्रामीण आवास योजना ते महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणारे ‘उमेद’ अभियान यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामविकास विभाग ग्रामविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवित आहे. ग्रामीण जनतेच्या जीवनमानाशी संबंधित असलेल्या विविध योजना ग्रामविकास विभाग राबवितो. या योजनांची माहिती असलेली ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ ही पुस्तिका सर्वांना उपयुक्त आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगारमंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0