•पुणे सातारा मध्ये हवामान खात्याचा रेड अलर्ट, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली
पुणे :- पुणे आणि सातारा परिसरात घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रावरुन येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. बाष्पयुक्त वारे वेगाने किनारपट्टीवर येत आहे. त्यामुळं किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मुंबई ठाणे रायगड पालघर यांसारख्या जिल्ह्यातही पावसाचे पुनरागमन झाले आहे. सकाळी पासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसून येत आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा आणि पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट माथ्यावर आज मुसळधार व तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.हवामान खात्याने दिला पाच ऑगस्टपर्यंत अलर्ट दिला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 90 टक्के भरले आहे. येत्या दोन महिन्यात खान्देश ,मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे. तर कोकण , मध्य महाराष्ट्रात पाऊस सरासरी एवढा राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…