Ravindra Dhangekar Latest News : पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा
पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची Ajit Pawar राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या गोटात मोठे भगदाड पडल्याचे मानले जात आहे. या घडामोडीवर भाष्य करताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी जगतापांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
“कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही”
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “प्रशांतदादा हे पुणे शहरातील एक अत्यंत अभ्यासू आणि सक्षम कार्यकर्ते आहेत. त्यांनी शहराचे महापौर म्हणूनही काम केले आहे. राजकारणात एक चांगला कार्यकर्ता घडण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. मी जरी आज दुसऱ्या पक्षात असलो आणि आमची विचारसरणी वेगळी असली, तरी एका चांगल्या कार्यकर्त्याला सन्मान देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.”
पक्षप्रमुखांचा आदेश सर्वोच्च!
धंगेकर यांनी जगतापांना सल्ला देताना सांगितले की, “पक्षप्रमुखांनी जेव्हा एखादा आदेश दिला असतो, तेव्हा वैयक्तिक अन्याय बाजूला ठेवावा लागतो. पक्षप्रमुखांना संपूर्ण पक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या भविष्याची काळजी असते. 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे, त्यामुळे प्रशांत जगताप यांनी पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचा विचार करावा. एकदा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला की, पुन्हा शून्यातून उभे राहण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो.”
नेमकी नाराजी कशावर?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावे, अशा वाटाघाटी वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रशांत जगताप यांना ही युती रुचलेली नाही. ज्यांच्या विरोधात आपण सातत्याने लढलो, त्यांच्यासोबतच निवडणूक लढणे आपल्या प्रतिमेला तडे देणारे ठरेल, अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.
भाजपमध्ये जाणार नाही, पण निवडणूक लढणार!
प्रशांत जगताप यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. पण माझ्या मनाला जे पटत नाही, ते मी करू शकत नाही. मी महानगरपालिका निवडणूक नक्कीच लढणार आहे, पण कोणत्या पक्षाकडून किंवा स्वतंत्र, याचा निर्णय दोन दिवसात घेईन,” असे जगताप यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…