Ravindra Dhangekar : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश

•रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा झटका, कॉलेजच्या आक्रमक नेता म्हणून ओळख
मुंबई :- पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले आहे.पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना ( शिंदे) पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार धंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.


2023 मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “आता लोकांना कळेल हू इज धंगेकर?” अशी मिश्किल टिप्पणी केली. शिंदे यांच्या या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान निवडणुकीच्या दरम्यान धंगेकर बद्दल विचारले असता हू इज धंगेकर? हे विधान चांगलेच गाजले आणि त्यानंतर त्यांच्या विजयानंतर त्यांनी या विधानाला प्रत्युत्तर देत चंद्रकांत दादा पाटील यांचे खिल्ली उडवली होती. ललित पाटील प्रकरण असो किंवा पुण्यातील ड्रग्ज माफिया त्याबद्दल सातत्याने धंगेकर यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसने आदेश मोठा नेता गमावल्याचे पाहायला मिळत आहे.