Pune News : रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांचा पुण्याच्या राज्य उत्पादन विभागावर धडक मोर्चा
Ravindra Dhangekar And Sushma Andhare : धंगेकर आणि सुषमा अंधारे आक्रमक ; थेट राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच हॉटेल मधून आणि पब मधून लाखोंचा हप्ता चा पाढा वाचला
पुणे :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी राज्य उत्पादन शुल्काचे विभागात धडक मोर्चा काढत पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली. काही हजारांपासून ते लाखांपर्यंत ही यादी असल्याचे सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतून समोर आले. (Pune Porsche Accident) यावेळी शांत उभे राहून ऐकून घेण्याची वेळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. सुषमा अंधारे Sushma Andhare आणि रवींद्र धंगेकर Ravindra Dhangeka यांनी यांनी कार्यालयामध्ये पोहोचत पब संस्कृतीवर एक प्रकारे हातोडा टाकताना कारवाई कधी करणार? अशी विचारणा करत विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची माहिती दिली. Ravindra Dhangekar And Sushma Andhare Clash Excise Department Pune Porsche Case
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे एक्साईजला जबाबदार धरलं आहे. अंधारे आणि धंगेकर दोघांनीही थेट पुणे एक्साईजचं कार्यालय गाठलं आणि पुणे एक्साईजच्या अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले आहेत.आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांना अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. अशा एकापाठोपाठ प्रश्नण रवींद्र धंगेकर यांनी केली.
अंधारे आणि धंगेकरांच्या आरोपानंतर पुणे एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, “आमच्यावर केले जात असलेले आरोप पर्णतः चुकीचे आरोप आहेत. तरीसुद्ध पुणे एक्साईज विभागाचा प्रमुख म्हणून यामध्ये काही होत असेल, तर याबाबत चौकशी आम्ही करू आणि याप्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. Ravindra Dhangekar And Sushma Andhare Clash Excise Department Pune Porsche Case
कशा प्रकारे पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे ; रवींद्र धंगेकर
पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला.
पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे सुपरटेंडंट घरण सिंग राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेल मधून पैशाचे पाकीट पुरवले जाते ती लिस्ट खालीलप्रमाणे,
विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भुगांव भुकुम, बाणेर, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी. भागातील कलेक्शन करणारे कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात.
- पुणे परिसरातील लेट नाईट व रुफ टॉपवाले..
1. एजंट जॅक्स प्रत्येक outlet ५० हजार total १० -१२ outlet
2. बॉलेर २ लाख महिना
3. 2 bhk lakh. (राजाबहादूर मिल्स)
4. दिमोरा १ lakh (राजाबहादूर मिल्स)
5. मिलर १ लाख (राजाबहादूर मिल्स)
6. TTF rooftop ५० हजार (बाणेर)
८. बँक स्टेज ९० हजार (Vimanngr. & Moh. Wadi)
९. ठीखणा १.५ लाख ३ outlet चे
१०. स्काय स्टोरी ५० हजार
११. जिमी दा ढाबा ५० हजार ( पाषाण)
१२. टोनी दा ढाबा ५० हजार
१३. आयरीश ४० हजार
१४. टल्ली टुन्स – ५० हजार
१५. ऍटमोस्ट फेयर ६० हजार
१६. रुड लॉज ६० हजार
१७. द टिप्सी हॉर्स ६० हजार
१८.रेन फ़ॉरेस्ट रेस्टो बार ५० हजार
१९. 24K-बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड – १.५ लाख
२०. कॅफे सीओ 2 (cafe CO2) हॉटेल भूकंम १ लाख महिना
२१.कोको रिको हॉटेल भूगाव ७५०००/- महिना
२२. स्मोकी बिच हॉटेल भुकुंम ७५०००/- महिना
२३.सरोवर हॉटेल भूगाव १ लाख महिना
२४.जिप्सी हॉटेल भुकुंम ५०००० महिना
२५. ७ : साईबा हॉटेल ३००००/-
या सह वाईन्स शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे १८ हॉटेल बार, २ वाईन्स शॉप, ३ बिअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) ३.५ लाख रुपये.
२६. बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन्स शॉप, ३५ बिअर शॉपी ५.५ लाख (होलसेल लिकर)
२७. कैलास जगताप व इतर यांचे ११ बार, ८ वाईन्स शॉप, ९ बिअर शॉपी २.५ लाख (होलसेल लिकर)
२८. कोरेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, या भागातील सर्वच लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंटला प्रत्येकी कमीत कमी ५० हजार महिन्याला (प्रत्येकी)
२९. वाईन्स शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला कमीत कमी महिन्याला – २० (प्रत्येकी)
३०.रेस्टॉरंट व ढाबेच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी – महिन्याला कमीत कमी २५ ते ५० (प्रत्येकी)
३१. शाम जगवानी व इतर यांचे ११ वाईन्स शॉप मधून होलसेल दारू विक्री व ऑनलाईन होम डिलेव्हरी करिता महिन्याला २.५ लाख.
३२.एक्साइज division १२ – प्रत्येक ५० हजार – ६ लाख रूपये.
३३. दारु चे होलेसेलर ३२ – ५० हजार प्रत्येकी महिना.
३४. साखर कारखाने १८ ते २० कारखाने -५० हजार महिना
३५.नवीन परमिटरूमबार – १२ (ग्रामीण)
३६.नवीन परमिटबार -१२ ते १५ (महानगर पालिका)
३७. बिअर शॉपी (ग्रामीण)- ३
३८. बिअर शॉपी (शहर)- ५
स्वतः एजेंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतो, आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे हे दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती त्रातस्त एक्साईजच्या स्टाफनी दिलेली आहे.
७८ लाख रूपये महिना कलेक्शन असून २ वर्षात नवीन लायसेन्स केलं त्याचे २.५ कोटी रुपये.
अशाप्रकारे लाखो रुपयांचा हप्ता पोलीस प्रशासन या पब आणि बार मालकांकडून गोळा करत आहेत.
हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुण्याच्या पोलीस प्रशासनाला लागलेली कीड व पुण्याच्या संस्कृतीचा मांडलेला खेळ अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे.