मुंबई

Ravindra Chavan : विलासरावांवरील टीकेनंतर रवींद्र चव्हाणांची ‘दिलगिरी’; देशमुख पुत्रांच्या आक्रमक पवित्र्यासमोर भाजपची नरमाई

Ravindra Chavan Latest News : “माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”; संभाजीनगरमध्ये चव्हाणांचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर | दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, या विधानावरून चौफेर टीका ओढवून घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. “माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमका वाद काय होता?

लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रवींद्र चव्हाण यांनी “लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील,” असे विधान केले होते. या विधानामुळे लातूरच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला होता. विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांनी याला ‘दुर्दैवी’ म्हटले होते, तर अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियावर “लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही” असा व्हिडिओ शेअर करून चव्हाणांना आरसा दाखवला होता.

संभाजीनगरमध्ये चव्हाणांचे स्पष्टीकरण

आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाणांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले,

टीका नाही, विकासावर भाष्य “मी विलासरावांविरोधात कोणतीही वैयक्तिक टीका केलेली नाही. निवडणुका या नागरी सुविधा आणि विकासासाठी होत असतात. लातूरमध्ये गतिमान विकास व्हावा, हाच माझा उद्देश होता.”काँग्रेस आजही केवळ विलासरावांच्या नावावर मते मागत आहे, तर आम्ही मोदींच्या नेतृत्वातील कामावर मते मागत आहोत.””असे असले तरी, जर कोणाच्या मनाला या विधानामुळे वेदना झाल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”

काँग्रेस आणि देशमुख कुटुंबाचा विजय?

रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस वर्तुळातून समाधान व्यक्त केले जात आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी यापूर्वी चव्हाणांच्या जाहीर माफीची मागणी केली होती. लातूरमध्ये विलासरावांचे असलेले भावनिक स्थान किती भक्कम आहे, हे चव्हाणांच्या या माघारीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

राजकीय वळण

महापालिका निवडणुकीच्या काळात ‘बॅकफूट’वर जाणे भाजपला परवडणारे नसल्याने, चव्हाणांनी वेळीच दिलगिरी व्यक्त करून डॅमेज कंट्रोल केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, लातूरकर या दिलगिरीला कसे स्वीकारतात, हे येत्या निवडणुकीतच स्पष्ट होईल.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago