Ravindra Chavan : फडणवीसांचा पाठिंबा स्पष्ट; चव्हाण यांच्या नेतृत्वगुणांची दिली प्रशंसा
मुंबई | महाराष्ट्र भाजपमध्ये नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग आला असून, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित झालं आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी थेट केंद्रीय निरीक्षक किरेन रिजिजू यांच्या समोर आपला अधिकृत अर्ज दाखल केला आहे.
या महत्त्वाच्या घडामोडीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि इतर वरिष्ठ भाजप नेते देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा 1 जुलै रोजी संध्याकाळी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक करत, त्यांच्या जडणघडणीचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. युवक मोर्चातील कार्यकर्त्यापासून नगरसेवक, आमदार आणि आता मंत्री म्हणून त्यांनी यशस्वी वाटचाल केली, याचा उल्लेख त्यांनी खास केला.
रवींद्र चव्हाण हे 2009 पासून सलग चार वेळा डोंबिवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत असून, त्यांचं संघटनात्मक कौशल्य आणि पक्षप्रवेश मोहिमांतील पुढाकार लक्षवेधी ठरले आहेत. भाजपमध्ये त्यांचा वाढता प्रभाव, कार्यपद्धती आणि संयमी नेतृत्वशैली पाहता, त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा आता केवळ औपचारिकतेवरच उरली असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…