•Ravindra Chavan to build Maharashtra Sadan काश्मीरमध्ये अडीच एकरात महाराष्ट्र सदन बांधण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा
मुंबई :- भारताचा स्वर्ग म्हणून ज्याची ओळख असलेल्या हिमवृष्टीने मनमोहक करणाऱ्या काश्मीरला लवकरच आता महाराष्ट्र सदन मिळणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून काही वर्षातच काश्मीरमध्ये अडीच एकरामध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.महाराष्ट्र सदन उभारण्याच्या दृष्टीने दोन्ही राज्यांत आवश्यक प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरूपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहील, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
बडगाम येथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या 2.50 एकर जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…