Ravi Landge With Uddhav Thackeray : राज्यात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, रवी लांडगे यांचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
•या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी नेत्यांचे पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू असते. दरम्यान, भाजप नेत्याने शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला आहे.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत रवी लांडगे यांनी असंख्य कार्यकर्त्यांबरोबर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.
कोण आहेत रवी लांडगे?
रवी लांडगे हे पिंपरी-चिंचवड शहर (भोसरी) भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र आहेत. ते आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजपचा झेंडा रोवला होता. भाजपकडून ते दोन वेळा नगरसेवक निवडून आले.रवी लांडगे घराण्याचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून उदयास आले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे भाजपचे नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे जुने निष्ठावंत म्हणून रवी लांडगे आणि त्यांचे कुटुंब ओळखले जाते.