Ravi Dolas : शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा समन्वय रवी डोळस याची पक्षातून हकालपट्टी
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2025/02/bf954194-c900-42bd-aeab-a36f3f15e9f5-680x470.jpeg)
Ravi Dolas : माजी आमदार राजन साळवी यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून जिल्हा समन्वय रवी डोळस यांची हकालपट्टी करण्याचे पत्र शिवसेनेकडून जारी करण्यात आले आहे
मुंबई :- राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाला गळती लागले असताना शिवसेना ठाकरे येथील रत्नागिरीतील अनेक नेत्यांना पक्षातून हकलपट्टी केली आहे. असे पत्र शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत Vinayak Raut यांनी प्रसारित केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक रवी डोळस Ravi Dolas यांनी पक्षाविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाचे अनेक खासदार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे चर्चा सध्या राजकारणात चांगल्याच रंगू लागले आहे. एकीकडे आदित्य ठाकरे दिल्ली वारीवर असताना दुसरीकडे राज्यात दिग्गज नेत्याच्या पक्ष शिवसेना ठाकरे कडून पक्षातील काही नेत्यांविरोधात पक्षविरुद्ध भूमिका घेतल्याने कठोर कारवाई करत आहे.