शेतजमिनीच्या नोंदीसाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी, तलाठी व शिपाई अटकेत,फेरफाराच्या बदल्यात लाच घेताना महसूल त्रिकुट अटकेत!
रत्नागिरी :- शेतजमिनीचा फेरफार करून देण्यासाठी तब्बल 30 हजारांची लाच घेताना मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही धडक कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली असून महसूल खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
शेणाळे गावातील तक्रारदाराने पत्नीच्या नावे लिलावातून शेतजमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेरफार सातबारावर नोंदवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 50 हजारांची मागणी करण्यात आली. शिपाई मारुती भोसलेने यातील 45 हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले, तरीही नोंद रद्द करण्यात आली.
यावर संतप्त तक्रारदाराने मंडळ अधिकारी अमित शिगवण, तलाठी श्रीनिवास श्रीरामे व शिपाई भोसले यांची भेट घेतली. फेरफार मंजुरीसाठी पुन्हा 30 हजारांची लाच मागण्यात आली. तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत सापळा रचण्यात आला.
सर्व नियोजनानंतर मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी लाचरक्कम स्विकारली. त्यातील 15,500 रुपये स्वतःजवळ ठेवून उर्वरित रक्कम तलाठी श्रीरामे यांना सुपूर्द केली. ही रक्कम पंचासमक्ष स्विकारताना तिघांनाही रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईनंतर महसूल विभागातील भ्रष्ट वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…