Ration Card : पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर.. शासनाकडून आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार..
•White Ration Card Benefits केशरी पिवळे रेशन धारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत होता, शासनाकडून आता पांढरे रेशन कार्ड धारकांनाही मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ
मुंबई :- अन्न नागरी व संरक्षण पुरवठा विभागाने काढलेल्या अध्यादेशमध्ये आता पांढरे रेशन कार्डधारकांना देखील आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. परिपत्रक काढण्यात आले आहे.केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार आयुष्मान योजनेच्या लाभार्थी घटकामध्ये पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. या साठी त्यांना त्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करावे लागणार आहे. White Ration Card Benefits
त्यामुळे आता य पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता व आयुष्यमान कार्ड मिळवल्यासाठी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका या आधार कार्डशी लिंक करणे महत्वाचे ठरणार आहे. आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असेल तरच त्यांना या त्या दृष्टीने पांढरी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहीम राबवावी तसेच पांढरे रेशनकार्ड धारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक करावे असे आवाहन या अन्न, नागरी व पुरवठा संरक्षंण विभागाने केले आहे. White Ration Card Benefits