“Rathod and Sapkal: The Corrupt Police Duo of Chhatrapati Sambhaji Nagar”
राठोड आणि सपकाळ:छञपती संभाजी नगरची भ्रष्ट पोलीस जोडी
लाचलुचपत प्रतिबंध विभाग छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; पोलीस शिपाई आणि पोलीस हवलदार एसीबीच्या जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर :- वाळू वाहतुकीची गाडी गंगापूर पोलीस हद्दीतून चालून देण्यासाठी कारवाई न करण्याकरिता पोलीस अंमलदार सुनील मूलचंद राठोड, पोलीस हवालदार लक्ष्मीकांत हरिश्चंद्र सपकाळ यांनी खाजगी व्यक्तीच्या मार्फत वाळू वाहतुकी करण्याकरिता संरक्षणाकरिता 15 हजारची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे.
वाळूचा टेम्पो गंगापूर पोलीस हद्दीतून संरक्षण देण्याकरिता पोलिसांची लाच
यातील तक्रारदार यांची वाळू वाहतुकीची हायवा गाडी गंगापूर हद्दिमधून चालू देण्यासाठी तसेच त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी राठोड व सपकाळ यांनी पंचा समक्ष 15 हजारांची लाचेची मागणी करून राठोड यांनी 15 हजार रुपये खाजगी इसमाच्या मार्फतीने स्वीकारून स्वीकारलेल्या लाचेच्या रकमेसह मोटार सायकल वरून पळून गेला आहे. त्यावरून त्यांचेविरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस, अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर यांच्या युनिटने पोलीस हवालदार भीमराज जिवडे, युवराज हिवाळे, केवलसिंग गुसिंगे अँटी करप्शन ब्युरो , छत्रपती संभाजीनगर. या पथकाने लाचखोर पोलिसांना अनेक खाजगी व्यक्तीला अटक केली आहे.