पुणे, दि. ९ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Ramtekadi murder
पुणे शहरात दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. आज दि. ९ रात्री उशिरा रामटेकडी येथे टोळक्याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरुणाचा सिमेंट ब्लॉक, दगडाने ठेचून खून केला. (ramtekadi murder) खुनाची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
खुन झाल्याचे कळताच रामटेकडी हडपसर परिसरात दहशत पसरली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू शिवशरण यांच्या नातेवाईकांनी केली असून गुन्हे दाखल न झाल्यास वानवडी (wanwadi police station) पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे सूत्रांकडून समजते. (pune breaking news)
राजू शिरीष शिवशरण, अंदाजे वय ३५ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजू शिवशरण (Raju Shivsharan) हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. राजू शिवशरण व आरोपी यांच्यात पूर्ववैमनस्य असल्याचे देखील माहिती समोर येत आहे.
रात्री राजू शिवशरण रामटेकडी वंदेमातरम चौक येथून जात असताना अल्पवयीन आरोपींनी शिवशरण यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु राजू यांनी पैसे न दिल्याने अल्पवयीन गुन्हेगारांनी सिमेंट ब्लॉक, दगडाने शिवशरण यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…