क्राईम न्यूजपुणे
Trending

Ramtekadi Murder | अल्पवयीन मुलाने खून केला आता ‘आई’ भोगणार जेल : रामटेकडी खून प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा

  • बाल गुन्हेगारांना रोखण्यासाठी कडक कारवाई : वपोनि संजय पतंगे
  • वानवडी पोलिसांकडून आरोपी ५ अल्पवयीन तात्काळ ताब्यात
  • अल्पवयीन गुन्हेगारांच्या आईवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

पुणे, दि. १० ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Ramtekadi Murder

पुणे शहरात दिवसेंदिवस घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातला आहे. यात अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग चिंतेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन गुन्हेगारांना रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांनी (Pune Police) थेट पालकांवर गुन्हा दाखल करण्याचे धोरण हाती घेतल्याने खळबळ उडाली आहे. दि. ९ रात्री उशिरा रामटेकडी येथे टोळक्याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरुणाचा सिमेंट ब्लॉक, दगडाने ठेचून खून केला होता, यात अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यानंतर थेट गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा नोंद करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. Ramtekadi Murder

वानवडी पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पतंगे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत टोळक्यातील सर्व ५ अल्पवयीन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा दाखल करत यापुढे कोणी अल्पवयीन गुन्हेगाराने कायदा हातात घेतल्यास त्याच्या पालकांना याचे परिणाम भोगावे लागतील असा संदेश दिला आहे. Ramtekadi Murder

मयत राजू शिवशरण (Raju Shivsharan) रामटेकडी वंदेमातरम चौक येथून जात असताना अल्पवयीन आरोपींनी शिवशरण यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु राजू यांनी पैसे न दिल्याने अल्पवयीन गुन्हेगारांनी सिमेंट ब्लॉक, दगडाने शिवशरण यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केला होता. Ramtekadi Murder

खुन झाल्याचे कळताच रामटेकडी हडपसर परिसरात दहशत पसरली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू शिवशरण यांच्या नातेवाईकांनी केल्याने वानवडी पोलीस ठाणे वपोनि संजय पतंगे यांनी थेट अल्पवयीन गुन्हेगारांच्या आईवर गुन्हा दाखल करत बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

सदरची कारवाई ही मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर Pune Police, आर राजा, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व संजय पतंगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, संजय आदलिंग, व पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, दाऊद सय्यद, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, गोपाल मदने, अमोल पिलाणे या विशेष पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0