Ramesh Tarakh : मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले

Maratha Protest Vs Dr Ramesh Tarakh : मराठा समाज आक्रमक, डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला मराठा आंदोलकांनी काळे फासले
छत्रपती संभाजीनगर :- मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांच्या उपोषणाला विरोध करणाऱ्या तसे पत्र लिहिलेल्या डॉक्टर रमेश तारख Ramesh Tarakh यांना मराठा आंदोलकाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. झुंजार छावा संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. डॉ. रमेश तारख यांना कोणतेही कल्पना नसताना ही घटना घडली आहे ही घटना त्यांच्या रुग्णालयात घडली असून डॉक्टरांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पेशंट म्हणून भेटण्याकरिता आलेल्या त्यानंतर माझा सत्कार केला आणि माझ्या चेहऱ्याला काळे फासण्यात आले असे स्पष्टीकरण डॉक्टरांकडून देण्यात आले आहे.
ओबीसी विरुद्ध मराठा OBC VS Maratha अशा वादात आपल्याला मराठा नेतेच साथ देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. ओबीसी आरक्षण बाचावासाठी सर्व ओबीसी एकत्रीत येत आहेत. मात्र, राज्यातील मराठा नेते मला एकटे पाडत असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यात मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध करणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. वास्तविक आधी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आणि नंतर त्यांच्या तोंडाला काळे फासून विरोध करण्यात आला आहे. झुंजार छावा संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.