Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 115 पोलिसांना पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
Ramesh Bais Awarded Medal To Police : राज्यातील 115 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान
मुंबई :- राजभवन मुंबई Rajbhavan Mumbai येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये 2021 च्या स्वातंत्र्य दिनी तसेच 2022 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.राज्यातील 115 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस Ramesh Bais Awarded Medal To Police यांच्या हस्ते आज पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. Maharashtra Police News
30 पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर 7 पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली. 78 पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. Maharashtra Police News
समारंभाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. Maharashtra Police News
विनय कारगांवकर, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, वाहतूक मुंबई, आशुतोष डुंबरे, आयुक्त ठाणे शहर, अशोक अहिरे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण, विनोदकुमार तिवारी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर जिल्हा, प्रल्हाद खाडे, सेवानिवृत्त समादेशक, रा. रा. पो. बल – गट क्र. 6, धुळे, चंद्रकांत गुंडगे, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड व मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नांदेड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. Maharashtra Police News
Web Title : Ramesh Bais: Governor Ramesh Bais conferred Police Gallantry Medal, President’s Police Medal to 115 policemen.