•डॉ. आंबटकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते होते
पुणे :- माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे निधन झाले आहे.चेन्नई येथील महात्मा गांधी मेडिकल मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. किडनीच्या आजारामुळे त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांनी संघाच्या कामातूनच राजकारणात प्रवेश केला आणि विधान परिषदेवर निवडून येत आमदार म्हणून कार्य केले.
डॉ. आंबटकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते होते आणि विद्यार्थी जीवनातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात उतरल्यानंतर त्यांनी भाजपच्या माध्यमातून राजकीय वाटचाल सुरू केली. 2004 मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. 2018 मध्ये ते वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडून श्रद्धांजली
रामदास आंबटकर यांच्या निधनानंतर अतिशय दुःख झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. विदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी रामदासजींनी कठोर परिश्रम घेतले. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी कायम आवाज उठवला. कुशल संघटक आणि विचारधारेप्रती कायम समर्पित असलेल्या रामदास आंबटकर यांच्या निधनाने विदर्भातील सामाजिक-राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती, असे गडकरी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…