Kashmira Police News : “गांजाचे गुप्त जाळे फोडले; चार तस्कर गजाआड!”काशीमिरा पोलिसांची अंमली विरोधात जोरदार कारवाई!

Kashmira Police Latest News : “गांजाच्या तस्करीचा भिवंडी कनेक्शन उघड!”काशीमिरा पोलिसांची कारवाई; सराईत गुन्हेगारासह चौघे अटकेत
मीरा रोड :- राज्यात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा मोठा फटका भिवंडीच्या ड्रग माफियांना Bhiwandi Drug Mafia बसला आहे. काशीमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे Mumbai Thane Crime Beanch प्रकटीकरण शाखेने एक धडाकेबाज कारवाई करत सुमारे 70.919 किलो गांजा आणि एकूण 16.19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये एक सराईत गुन्हेगार जामिनावर बाहेर असलेला असल्याचे उघड झाले आहे. Mira Road Latest Crime News
70 किलो गांजासह 16 लाखांचा साठा जप्त, भिवंडीच्या चार ‘ड्रग डीलर्स’ना बेड्या
24 मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भिवंडी येथील ‘शांतीनगर’ परिसरातील चार संशयित इसम गांजा विक्रीसाठी निघाल्याची खबर पोलिसांना मिळाली. लगेचच सापळा रचून पोलिसांनी खालील चार आरोपींना ताब्यात घेतले:
अख्तर रफिक शेख (32 वय)
जच्यार खाजामिया शेख (30 वय)
शाहरीक जमीर अन्सारी (21 वय)
अजगर अली अर्शद हुसैन अन्सारी (21 वय)
या चौघांकडून 14 लाख 18 हजार 380 रुपये किमतीचा गांजा, 2 लाखांचा टेम्पो, स्कूटर आणि 640 रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. एकूण मुद्देमालाची किंमत 16 लाख 19 हजार 020 रुपये इतकी आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला अख्तर रफिक शेख हा ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा, अंबड, भद्रकाली आणि सातपूर पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो एका गुन्ह्यात जामिनावर मुक्त असल्याचेही समोर आले आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक यांनी 1 मे ते 30 मे 2025 या कालावधीत विशेष अंमलीविरोधी मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर, वसई-विरार यांच्या मार्गदर्शनाखाली, काशीमिरा पोलिसांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.


