Ram Seth Thakur : २०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न
पनवेल जितिन शेट्टी : २०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर Ram Sheth Thakur यांच्या हस्ते बुधवारी (१ जाने.) रोजी करण्यात आले.
गणपत वारगडा हे आदिवसी सम्राटचे संपादक असून ते वेळोवेळी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडत असतात. एवढंच नाही तर गणपत वारगडा हे सामाजिक कार्यकर्ते असून ते आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या आदिवासी सेवा संघाच्या वतीने समाजात प्रबोधन करत असतांना अनेकांना न्याय देखील देत असतात, असे दिनदर्शिकेचे प्रकाशन करतावेळी लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते श्री. वाय.टी. देशमुख, जेष्ठ पत्रकार अनिल भोळे, पत्रकार शंकर वायदंडे, रवींद्र गायकवाड, अनिल कुरघोडे, आदिवासी सेवा संघाचे सचिव सुनील वारगडा, आशिष साबळे आदि. उपस्थित होते.