मुंबई
Trending

Rajya Sabha Election Result 2024: राज्यसभा निवडणुकीचा निकाल आला, महायुती जोमात

BJP’s Darhysheel Patil and NCP’s Nitin Patil were elected to the Rajya Sabha unopposed :  राज्यसभेच्या दोन जागांवर राष्ट्रवादीचे नितीन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सोमवारी दोघांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मुंबई :- नुकतीच राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांबाबत महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली होती. आता या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे नितीन पाटील Nitin Patil आणि भाजपचे धैर्यशील पाटील Darhysheel Patil यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी शिवाय अन्य दोन अपक्षांनीही उमेदवारी दाखल केली होती, मात्र अखेर नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

राज्यसभेच्या या दोन जागांसाठी भाजपने धैर्यशील पाटील यांना तिकीट दिले होते, तर राष्ट्रवादीने नितीन पाटील यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत दोन अपक्षांनीही प्रत्येकी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र पडताळणीदरम्यान या अपक्षांच्या अर्जांवर अनुमोदकांच्या सह्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळे तिन्ही अर्ज फेटाळण्यात आले. आता सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना राज्यसभेवर नियुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सातारा येथील वाई येथे झालेल्या सभेत साताऱ्यातून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून नितीन पाटील खासदार होण्याची वाट पाहत होते. अखेर राज्यसभेच्या निवडणुकीत नितीन पाटील यांना तिकीट देऊन अजित पवारांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आणि आता नितीन पाटील राज्यसभेचे खासदार होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0