Rajya Sabha Bypolls: नितीन पाटील यांनी आपला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला
Nitin Patil Submited Rajya Sabha Bypolls : प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरला आहे
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये नितीन पाटील यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नितीन पाटील Nitin Patil यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रातल्या दोन जागे करिता राज्यसभेची Rajya Sabha Bypolls 3 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर करून त्यांनीही अर्ज भरला आहे. महायुतीतून भाजपाचे धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या दोन खासदारांचे लोकसभेवर वर्णी लागल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक घेण्यात येणार आहे. पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या जागी या निवडणुका घेण्यात येत आहे.
धैर्यशील पाटील हे यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते आहेत.नितीन पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार यांचे बंधू असून सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये त्यांचा प्रभाव आहे. नितीन पाटील हे सातारा डीसीसी बँकेचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या बँकेच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. अनेक व्यासपीठांवर ते अजित पवारांसोबतही दिसतात.