Raju Waghmare in Shivsena : काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश
•Raju Waghmare In Shivsena महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई :- काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मंगळवारी (9 एप्रिल) शिवसेनेत प्रवेश केला. राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीरपणे शिवसेनेत अधिकृत प्रवेश घेतला आहे. राजू वाघमारे हे दीर्घकाळ काँग्रेसचे प्रवक्ते होते. याआधीही त्यांनी अनेकदा पक्षाची भूमिका जाहीरपणे मीडियासमोर मांडली होती. अशा स्थितीत त्यांनी आता काँग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडला असून यापूर्वी मुंबई काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, अशोक चव्हाण यांसारखे दिग्गज नेते काही दिवसांपासून पक्षाला सोडचिट्टी देत इतर पक्षात जाहीर रित्या प्रवेश करत आहे. मिलिंद देवरा यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. बाबा सिद्ध की यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. राजू वाघमारे गेले कित्येक दशकापासून सातत्याने काँग्रेस पक्षाबाबत ठाम भूमिका सर्व माध्यमांसमोर ठोकपणे मांडत आले आहे. राजू वाघमारे यांनी बीडीडेचाळीसंदर्भात अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला आहे या सगळ्या घडामोडीनंतर आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसची बाजू आता कोण मांडणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. एकीकडे महाविकास आघाडी यांची पत्रकार परिषद चालू असताना तत्पूर्वी राजू वाघमारे यांचा प्रवेश काँग्रेसला खिंडार पडणार आहे.