Rajmata Jijabai : शिवचरित्र घडवणाऱ्या मातृशक्तीचा आज स्मरणोत्सव; एका स्त्रीच्या रुपात अखंड राष्ट्रधारणेची प्रेरणा – राजमाता जिजाऊंना महाराष्ट्राचा मानाचा मुजरा
Rajmata Jijabai : आज 17 जून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी कार्याला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. हे केवळ एका स्त्रीचे स्मरण नाही, तर एका विचार, एका ध्येय, आणि एका संस्कृतीच्या उगमाचे स्मरण आहे. 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर मोठ्या दिमाखात पार पडला. पण या ऐतिहासिक सोहळ्यानंतर अवघ्या 12 दिवसांत 17 जून रोजी, पाचाड या गावी, त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या त्यांच्या मातोश्री जिजाऊंचं दुःखद निधन झालं.
जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव लखुजीराव जाधव तर आईचं नाव म्हाळसाबाई होतं. जाधव घराणं हे निजामशाहीतील प्रतिष्ठित सरदारांपैकी होतं. लहान वयातच त्यांचं लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झालं. पुढे शहाजीराजे बीजापूर दरबारी सरदार म्हणून कार्यरत असताना, जिजाऊ पुणे परिसरात राहून शिवाजी महाराजांचा सांभाळ करत होत्या.
शिवाजी महाराजांच्या बालवयात निजामशाही, आदिलशाहीसारख्या सत्तांमध्ये अराजकतेचे वातावरण होते. पण जिजामातांनी आपल्या पुत्राला केवळ तलवारीचा नव्हे, तर नीतीचा, न्यायाचा आणि धर्मशीलतेचा पाठ दिला. रामायण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीतेसारख्या ग्रंथांतून त्यांनी मुलामध्ये आत्मा जागवला. बालपणापासूनच त्यांना स्वराज्याच्या विचाराने घडवले.
राजमातांनी केवळ आईची भूमिका बजावली नाही, तर त्या एक कुशल प्रशासक, शस्त्रप्रशिक्षिका आणि गुप्तचरनीतीत पारंगत स्त्रीही होत्या. त्यांनी वेळोवेळी युद्धनीती, राजकीय धोरणे यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. रायगडावरील राजसभेच्या निर्णयांमध्येही त्यांचे मत महत्त्वाचे असे.
राजमातांनी आपल्या पुत्राला रामायण, महाभारत, गीता, तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र यांचा ठसठशीत बौद्धिक वारसा दिला. त्यांनी बालशिवबाला तलवार चालवणे, घोडेस्वारी, गनिमी काव्याचे तंत्र, राज्यकारभार याचे धडे दिले. राजमातांनी शिवरायांमध्ये “राजा” घडवण्याआधी “सत्यशोधक”, “धर्मनिष्ठ” आणि “प्रजावत्सल” माणूस घडवला.
त्यांनी मुलाच्या मनात स्वराज्याचे बीज पेरले. “आपलं राज्य हवं… धर्म आणि न्यायाच्या आधारावर उभं राहिलेलं” – ही शिकवण ही केवळ आईची नव्हे, तर एका राष्ट्रदृष्टिकोन असलेल्या विचारवंत स्त्रीची होती.
शिबंदीची बैठक, तर कधी गुप्तचरांची माहिती घेणं, अशा प्रत्येक राजकीय कामात त्यांचा सहभाग असायचा. पुण्याचा लालमहाल, जिथे शिवाजी महाराजांनी बालपण घालवलं, तो म्हणजे एक प्रकारचा स्वराज्याचा “शिक्षण केंद्र”च होतं – आणि त्या केंद्राच्या केंद्रस्थानी होत्या राजमाता.
त्यांचं धोरणी नेतृत्व, दूरदृष्टी आणि स्पष्ट विचारसरणी यामुळेच शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य उभं राहिलं. एकविसाव्या शतकातही, जेव्हा आपण “कॅप्टन ऑफ डेमोक्रसी” म्हणतो, तेव्हा त्या प्रवासाच्या मुळाशी राजमातांचे संस्कार आहेत, हे लक्षात ठेवायला हवे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…