Rajesh Kumar Chief Secretary
Rajesh Kumar Chief Secretary : सुजाता सौनिक यांच्याकडून 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार Rajesh Kumar Chief Secretary यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी आज (मंगळवार) 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
मुख्य सचिव राजेश कुमार हे 1988च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (भा.प्र.से.) अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे झाला. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, 25 ऑगस्ट 1988 रोजी ते सेवेत रुजू झाले.
आपल्या सेवाभरात त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी म्हणून 1989 मध्ये त्यांच्या प्रशासकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर सातारा, बीड, अमरावती, धाराशीव, जळगाव जिल्हाधिकारी, नाशिक व नवी मुंबईतील आयुक्तपद, तसेच मंत्रालयात पाणीपुरवठा, उद्योग, सहकार, ग्रामविकास, महसूल व वन आदी विविध खात्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.राजेश कुमार यांचा अनुभव, कार्यपद्धती आणि अभ्यासू दृष्टिकोन यामुळे महाराष्ट्र प्रशासनाला नवे बळ मिळेल, अशी प्रशासनातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…