Rajapur News : राजापुरात शेतकरी-मच्छिमार संघटनेचा एल्गार, मागण्या पूर्ण न झाल्यास मतदान नाही

रत्नागिरी : Rajapur News रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने आज पासून बेमुदत आंदोलनाची सुरुवात राजापूर तालुक्यातील गाव भू,येथून झाली असून शेतकरी व मच्छीमारांचे प्रश्न जो पर्यंत सुटत नाही तसेच शेतकरी आणि मच्छीमारांना योग्य तो हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून 22 ,23 ,24 या तीन दिवसांमध्ये भू , खिंनगिनी या गावांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार असून येणाऱ्या 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथून हा मोर्चा त्याचबरोबर आमरण उपोषणास सुरुवात होणार आहे.जोपर्यंत मच्छीमार आणि शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून जर का या आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही तसेच विधानसभा निवडणुकीवर शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल असा देखील इशारा शेतकरी व मच्छीमार संघटना तसेच हाजी शाहनवाज खान महाराष्ट्र महासचिव, विद्यार्थी आघाडी, एआयएमआयएम आणि कोकण विभाग प्रभारी, एआयएमआयएमच्या वतीने देण्यात आला आहे.