Rajan Vichar : शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांना ठाणे विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी?

Rajan Vichare : राजन विचारे यांनी सोशल मीडियावर ठेवले ठाणे 148 विधानसभा क्षेत्र, ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार?
ठाणे :- शिवसेना नेता आणि माजी खासदार राजन विचारे Rajan Vichare हे ठाण्याच्या 148 विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार का? Thane Vidhan Sabha Election असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. कारण राजन विचार यांनी आपल्या सोशल मीडियावर विधानसभेच्या रणांगणात मशाल धगधगणार… पुन्हा एकदा भगवा फडकणार… अशा आशयाचे सोशल मीडियावर पोस्ट करत 148 विधानसभा ठाणे मतदार संघ असा फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे राजन विचार यांना ठाकरे गटाचे उमेदवार आहे आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर संपूर्ण ठाण्यातील शिवसैनिक हे शिंदे कडे गेले असल्यास तरी एकमेव निष्ठावान म्हणून राजन विचारे हे उद्धव ठाकरे गटातच राहिले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राजन विचारे यांचा पराभव झाला असला तरी यंदाच्या विधानसभेत त्यांना संधी मिळणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. काही दिवसांपासून ठाणे विधानसभा क्षेत्रातून ठाकरे गटाकडून राजन विचारे तर एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पाचपाखाडी मतदारसंघातून आनंदी के यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे चर्चा सध्या सुरू आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजन विचारे यांचा शिवसेना शिंदे गटाकडून उभे असलेले नरेश मस्के यांनी 45 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे राजन विचारे यांना निष्ठेची संधी म्हणून ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा विधानसभेचे उमेदवारी मिळणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.