ठाणे, – महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे Rajan Vichare यांनी आज ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी भागात जोरदार प्रचार केला. “आपली निशाणी मशाल… शिवसेना जिंदाबाद…” या घोषणेने कोपरी परिसर दुमदुमून गेला. जागोजागी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांचे स्वागत करण्यात आले. असली शिवसेनेचे असली उमेदवार राजन विचारे Rajan Vichare यांना मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकप्रीय उमेदवार राजन विचारे Rajan Vichare यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराला सुरूवात केली आहे. विचारे यांनी इंडिया व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार स्वागत केले. ठाणे पूर्वेच्या नारायण कोळी चौक,अष्टविनायक चौक कोपरी,कोपरी गाव, नाखवा हायस्कूल,दौलत नगर धोबी घाट, आनंद नगर, गांधीनगर मेंटल हॉस्पिटल, वागळे नाका, डिसोजा वाडी,पंचपरमेश्वर मंदिर,रोड नं.१६, किसान नगर १, २, ३, भटवाडी, श्रीनगर, शांती नगर, आयटीआय नाका, रामनगर, टी एम टी डेपो, साठेनगर, जय भवानी नगर, इंदिरा नगर, लोकमान्य नगर डेपो, सावरकर नगर, महात्मा फुले नगर आई, माता मंदिर, अंबिका नगर, रामचंद्र नगर, वैती वाडी, लुईसवाडी, हजुरी, रघुनाथ नगर, काजूवाडी आदी ठिकाणी उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. Maharashtra Lok Sabha Live Update
त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, संजय घाडीगावकर, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख प्रदीप शेडगे, माजी नगरसेवक मिलिंद बनकर, हिरालाल भोईर गिरीश राजे, विभाग प्रमुख दत्ता पगावले, लहू सावंत, स्वप्नील शिरकर. महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महीला उप जिल्हा संघटक आकांक्षा राणे, महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, स्नेहा पगारे, सक्रीय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, प्रवक्ता अॅड. पूजा भोसले, अॅड. आरती खळे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष सुहास देसाई, आप चे अध्यक्ष सलुजा, काँगेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, सरचिटणीस सचिन शिंदे, महेंद्र म्हात्रे, राहुल पिंगळे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, कॉंग्रेस च्या महिला अध्यक्ष वैती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Maharashtra Lok Sabha Live Update
स्वपक्षातील कार्यकर्त्यांना हाडतुड करणे ही गद्दाराची खासियत – विचारे
गद्दार गटातील उमेदवाराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वपक्षातील कार्यकर्त्यांना हाडतुड करणे हीच त्याची खासियत असून शिवसैनिकांना त्रास दिला आहे. शिवसेना शाखेवर कब्जा करणे, विरोधकांची मुस्कटदाबी करणे, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे ही त्यांची गेल्या दोन वर्षांत ओळख केली असल्याची टीका राजन विचारे यांनी गद्दाराचे नाव न घेता केली. Maharashtra Lok Sabha Live Update