Rajan Vichare Thane : ठाण्यात राजन विचारे यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज केला दाखल
• Maharashtra Lok Sabha 2024 शिंदेच्या बालेकिल्लात ठाकरेंचा मावळ्याचे शक्ती प्रदर्शन, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हि उपस्थित
ठाणे :- शिवसेना फुटी नंतर ठाकरेचे अनेक आमदार खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सध्या बाळाच्या जोरावर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना पक्षाला देण्यात आले. या सर्व राजकीय घडामोडी नंतर शिंदे गटावर सातत्याने ठाकरे गटाकडून टीकास्त्र करण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे ठाण्याचे मावळे म्हणून पाहिले जाणारे राजन विचारे Rajan Vichare Thane यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडी कडून शिवसेना गटाचे नेते व विद्यमान खासदार राजन विचारे यांना लोकसभेची ठाण्यातून उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून अद्यापही कोणताही उमेदवार जाहीर झाला नाही. हे जागा शिवसेनेला सोडणार का भाजपाला यावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राजन विचारे Rajan Vichare Thane यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरला आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाच्या विकासाला गती मिळण्यासाठी, सच्चाईच्या लढाईला बळ देण्यासाठी, लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी, शिवशाही स्थापण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेसाहेब त्यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवच्या मार्गदर्शनाने, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड , युवासेना सचिव वरूण सरदेसाई व इंडिया महाविकास आघाडीच्या नेतृत्वात व सबंध ठाणे लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या साक्षीने मी आज उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. हा पाठिंबा उत्तरोत्तर वाढत जावो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
राजन विचारे यांचा राजकीय प्रवास
ठाणे शहराचा विकास आराखडा मंजूर होत असताना त्या कमिटीवरही ते प्रमुख म्हणून विराजमान होते. त्यानंतर, २००० साली त्यांना आमदारकीची संधी पक्षाने दिली. या आमदारकीच्या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली आणि पक्षाचा विश्वास सार्थकी ठरवला. त्यानंतर, Rajan Vichare Thane पुन्हा त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आणि २०१४ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची उमेदवारी दिली.निर्विवाद वर्चस्वपहिल्याच निवडणुकीत विचारे यांना दोन लाख ८२ हजारांचे निर्विवाद वर्चस्व संपादित करून खासदार होण्याचा मान मिळवला. त्यानंतर, २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे.