•कोकणात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजन तेली शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात पक्षांतराचे प्रमाणही वाढले आहे. पक्षाने जर तिकीट नाकारले तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाचे राजकीय नेते धडपड करत असताना कोकणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोकणातील भाजपचे नेते राजन तेली हे शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता दिसून येत असून राणेंकरिता हा मोठा धक्का समजला जातो.
राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. परंतु महायुतीची जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने भाजपा कडून आपल्याला डावलले असल्याचे म्हटले जात आहे. पक्षश्रेष्ठ कडून दखल न घेतल्याने राजन त्यांनी यांनी गुरुवारी भाजपाचा सावंतवाडी विभाग प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते शिवसेना ठाकरे जाणार असल्याचे चर्चा सध्या राजकीय पटलावर चालू आहे.
राजन तेली एकेकाळी नारायण राणेंसोबत होते. राजन तेली आणि नारायण राणे दोघांनी सोबतच शिवसेनेला रामराम ठोकला होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. तसेच नारायण यांच्याकडून भाजपमध्ये माझे खच्चीकरण होत असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास सांवतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत पाहायला मिळेल.
दीपक केसरकर यांच्याकडून पराभव
तेली यांनी 2019 मध्ये अपक्ष लढवली निवडणूक 2019 मध्ये भाजप शिवसेना युती असल्यामुळे सावंतवाडीमधून दीपक केसरकर उभे होते. तर राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत त्यांना आव्हान दिले होते. या निवडणुकीत केसरकर यांना 69 हजार 784 मते मिळाली होती, तर राजन तेली यांनी 56 हजार 556 मते मिळवली होती. त्यामुळे यावेळी ठाकरे गटाने राजन तेली यांना संधी दिल्यास दीपक केसरकरांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…