मुंबईठाणे
Trending

Rajan Teli : दसरा मेळाव्याच्या दिवशीच ठाकरेंना मोठा धक्का! एकेकाळचे निष्ठावान राजन तेली अखेर शिंदेंच्या शिवसेनेत

Rajan Teli Joined Eknath Shinde Shivsena :राजन तेलींचा राजकीय प्रवास वादळी; शिवसेना, काँग्रेस, भाजपमधून आता पुन्हा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश.

मुंबई :- विजयादशमीच्या दिवशीच राजकीय मैदानात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान समजले जाणारे सिंधुदुर्गचे माजी आमदार राजन तेली Rajan Teli यांनी अखेर एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात तेली यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला.

कोकणातील बालेकिल्ल्याला खिंडार

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण पट्ट्यातून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर, दसरा मेळाव्याच्या दिवशीच राजन तेली यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने शिंदेंची साथ देणे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, जिथे त्यांचा पराभव दीपक केसरकर यांच्या विरोधात झाला होता.

कोण आहेत राजन तेली?

राजन तेली यांचा राजकीय प्रवास अत्यंत वादळी आणि चढ-उतारांचा राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली महाविद्यालयात विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी सुरुवात केली:

1988 ते 1995 : कणकवली शाखेत शिवसेना शाखाप्रमुख आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली.

2005 : नारायण राणे यांच्यासमवेत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2007 : त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून पद भूषविले.

2012 : सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेचे चेअरमन पद सांभाळले.

2016 : भाजपने त्यांना राज्य सचिवपद दिले, तर 2020 साली ते भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष झाले.

2019 : भाजप-शिवसेना युतीत सावंतवाडीची जागा शिवसेनेला मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला.

अशा प्रकारे विविध राजकीय पक्षांत महत्त्वाचे स्थान भूषवलेले राजन तेली आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने, कोकणातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0