मुंबई

Rajan Salvi : माजी आमदार राजन साळवी आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार

Rajan Salvi Joined Eknath Shinde Shivsena : राजन साळवी यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट.. सकारात्मक चर्चा

मुंबई :- शिवसेना ठाकरे Shivsena Thackeray Group गटाला मोठी गळती लागले असताना ठाकरे गटाचे एकदम निष्ठावांत आणि मातोश्री च्या जवळचे मानणारे माजी आमदार राजन साळवी Rajan Salvi यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री हे खडक शिंदे यांची भेट घेतली. आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली. भेटीनंतर जिल्ह्यातील विकास कामासाठी जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गतिमान करण्याकरिता पक्ष प्रवेश करत आहे. अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी केलेले कामे यांना प्रभावित होऊन पक्षात प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, योग्य जबाबदारी आणि सन्मान देण्यात येईल असे इकडे शिंदे यांच्याकडून आश्वासित करण्यात आल्याचे सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी राजन साळवी यांना मदत केली नाही आणि अखेर त्यांचा पराभव झाला होता. यावर चर्चा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते. तेव्हा तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर दरवाजे उघडे आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांनाच सुनावले होते. दुखावलेल्या मनाने अखेर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता शिंदे गटाची कोकणात आणखी ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0