Raj Thackeray On Adani : अदानींचा फोटो व्हायरल करणाऱ्या भाजपची राज ठाकरेंनी काढली हवा; मुंबई-ठाणे वाचवण्यासाठी थेट युद्धाची हाक
ठाणे | मुंबईच्या शिवतीर्थावर अदानींच्या विस्ताराचा नकाशा मांडल्यानंतर भाजपने राज ठाकरे Raj Tha आणि गौतम अदानी Gautam Adani यांच्या भेटीचा जुना फोटो शेअर करून राज ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ठाण्याच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी याच फोटोचा आधार घेत भाजपवर तुफानी फटकेबाजी केली. “अदानी काय, रतन टाटा किंवा अंबानी काय, मोठे लोक माझ्या घरी येतात. पण घरी पाहुणा म्हणून आला म्हणजे काय मी त्यांची पापं झाकायची का?” अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपचे ‘फोटो पॉलिटिक्स’ धुडकावून लावले.
राज ठाकरे यांनी यावेळी अदानींच्या वाढत्या साम्राज्यावर अत्यंत बोचरी टीका केली. एकेकाळी केवळ एक विमानतळ आणि एक बंदर असलेल्या या माणसाचा देशभर जो विस्तार झाला आहे, तो केवळ केंद्राचा दबाव आणि नरेंद्र मोदींच्या नावाच्या जोरावरच झाला असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. “जेव्हा महाराष्ट्रावर किंवा मुंबई-ठाण्यासारख्या माझ्या शहरांवर संकट येईल, तेव्हा राज ठाकरे कसलीही दोस्ती-बिस्ती बघणार नाही, तर थेट शिंगावर घेईल,” असे ठणकावून सांगत त्यांनी ठाणेकरांना मुंबईवर घोंघावणाऱ्या संकटाची जाणीव करून दिली.
ठाणे शहराच्या वाढत्या प्रश्नांवर भाष्य करताना राज ठाकरे अधिक आक्रमक झाले. “हे ठाणं आपलं आहे आणि ते इतरांच्या घशात जाऊ नये, यासाठीच हे आमचं युद्ध सुरू आहे,” असे सांगत त्यांनी मतदारांना 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, मतदानावेळी होणाऱ्या फेरफार किंवा बोगस मतदानाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिले. “जर कोणी दुबार मतदान करायला आले किंवा बोगसगिरी करताना दिसले, तर तिथेच त्यांचे कान सुजवा, गाफील राहू नका,” असे आदेश देताच सभेत एकच जल्लोष झाला.
ठाणेकरांच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे संकट ओळखून वेळीच योग्य निर्णय घ्या, अन्यथा भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असा गंभीर इशाराही राज ठाकरेंनी यावेळी दिला. एकीकडे भाजपशी जुनी मैत्री आणि दुसरीकडे मुंबई-ठाण्याचं हित असा पेच निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना राज ठाकरेंनी आपल्या ‘ठाणे स्टाईल’ भाषणातून सडेतोड उत्तर दिले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…