Raj Thackeray News 😕मनसे प्रमुखांचा अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा; “मराठी ओळख खऱ्या अर्थाने जपणारे हेच दोन नावं”
हिंदी भाषा सक्तीवर राज ठाकरेंचा संताप; “महाराष्ट्रात असे होऊ देणार नाही”
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले आहे. ‘मुंबई तक’ या चर्चासत्रात बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले की, “राज्यात ठाकरे आणि पवार या दोन नावांना संपवण्याचा संगनमताने प्रयत्न सुरू आहे, मात्र तो निष्फळ ठरेल.”
राज ठाकरे यांचे हे विधान सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे टोला असल्याचे स्पष्ट जाणवते. “ही दोन्ही नावं ही केवळ व्यक्ती नाहीत, ती एक ओळख आहेत – जी महाराष्ट्राच्या जनमानसात खोलवर रुजलेली आहे,” असे ते म्हणाले.
हिंदी भाषेला शालेय शिक्षणात सक्तीचे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही राज ठाकरेंनी जोरदार विरोध दर्शवला. “हिंदी सक्तीने शिकवली जाणार असेल, तर महाराष्ट्रातील मातृभाषेचा अपमान होईल,” असे सांगत त्यांनी सरकारला नमवले आणि सरकारनेही माघार घेत हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा बनवण्याचा निर्णय थांबवला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळीक हे देखील सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना (ठाकरे) च्या ‘सामना’ या मुखपत्रातही या सुलहेसंदर्भात सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. “राज ठाकरेंनी मराठी जनतेसाठी नेहमीच आवाज उठवला आहे, आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका देखील मराठी हितासाठीच राहिली आहे,” असे लेखात नमूद करण्यात आले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील जवळीक चर्चेत आहे. दोन्ही पक्षांचे नेतेही एकमेकांबाबत सकारात्मक वक्तव्य करत आहेत. ‘सामना’मध्ये आलेल्या लेखात म्हटलं आहे की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सुलह ही महाराष्ट्रविरोधकांना अस्वस्थ करणारी गोष्ट ठरत आहे.” मराठी अस्मिता आणि हक्कांसाठी दोन्ही पक्षांचे विचार जवळचे असल्यामुळे भविष्यात काही महत्त्वाचे राजकीय बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज ठाकरे यांच्या या स्पष्ट आणि ठाम भूमिका पुन्हा एकदा दाखवून देतात की, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे-पवार’ या ब्रँडची मूळ ताकद अजूनही कायम आहे आणि ती कोणीही संपवू शकत नाही!
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…