Raj Thackeray Vs Sushma Andhare : राज ठाकरे यांचा “लाव रे तो व्हिडिओ”… ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र
•Raj Thackeray Vs Sushma Andhare महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची ठाण्याच्या सभेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व्हिडिओ लावत ठीके जाऊन उठवले
ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यात त्यांनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ लावत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या व्हिडिओत सुषमा अंधारे या बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख म्हातारा असा करताना दिसून येत आहेत. उद्धव यांचे वडिलांवर प्रेम असते तर त्यांनी बाळासाहेबांविषयी अपशब्द बोलणाऱ्या सुषमा अंधारेंना पक्षात घेऊन प्रवक्तेपद दिले असता का? असा सवाल राज यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरेंना केला. सुषमा अंधारे यांच्याकडून राज ठाकरे यांना देण्यात आले आहे. सुषमा अंधारे म्हणाले की,राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाची पहिली सुपारी दिली. यातच माझा विजय आहे, असा खोचक टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार करताना दिला.
सुषमा अंधारे ट्विट करतात की,
मिस्टर राज,
तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात..
शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.
माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली?
27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ? …पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना?
सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा…! धन्यवाद..!