Raj Thackeray Mira Road Sabha : सेंट पॉल स्कूल परिसरात होणाऱ्या उद्घाटनासाठी मनसे कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित; वाहतूक मार्गात मोठे बदल
मिरा रोड :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मिरा रोड पूर्व येथील नित्यानंद नगरमध्ये होणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. Raj Thackeray Mira Road Sabha
कार्यक्रम दि. 18 जुलै 2028 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पार पडणार असून, सेंट पॉल शाळेच्या आजूबाजूचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
काशिमीरा वाहतूक विभागाच्या प्रस्तावावरून आणि संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी पोलीस उपआयुक्त अशोक तानाजी विरकर यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
प्रवेश बंद रस्ते:
1.सेंट पॉल स्कूल ते गेटवे केमिस्ट – पुनम क्लस्टर कॉम्प्लेक्स या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने बंद.
पर्यायी मार्ग: सेक्टर-5, रामनगर, शांती गार्डनमार्गे वाहने वळवण्यात येतील.
2.ओमशांती चौक ते जांगिड इस्टेट रोड – सेंट पॉल स्कूल कडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग: सुष्टी रोड व सुष्टी सिग्नलमार्गे वाहतूक वळवण्यात येईल.
पोलीस, अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्स, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन वाहने, अधिकृत सरकारी वाहने, वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि मुंबई महापालिकेच्या परवानाधारक वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही.मिरा रोड पूर्व परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी 18 जुलै रोजी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि वाहन पार्किंगसाठी घोषीत मार्गांवर टाळाटाळ करावी, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…