Raj Thackeray React On One Nation One Election : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मोदी सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.
मुंबई :- केंद्राच्या नरेंद्र मोदी PM Modi One Nation One Election मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ या विधेयकाला मंजुरी दिली आहे. देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रामनाथ कोविंद समितीचा अहवाल बुधवारी मोदी मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यानंतर मोदी सरकारच्या या निर्णयावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. Maharashtra Latest Political Update
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray म्हणाले, केंद्र सरकारला एक राष्ट्र, एक निवडणूक सुधारणांची एवढीच काळजी असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात. ते म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह (BMC) राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.निवडणुकांना इतकं महत्त्व दिलं जात असेल, तर आधी महापालिका निवडणुका घ्या. Maharashtra Latest Political Update
राज ठाकरे काय म्हणाले?
‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.
बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…
पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे?
निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या…
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…