Raj Thackeray : बदलापूर लैंगिक छळाच्या घटनेवर राज ठाकरेंचा सवाल, ‘महाराष्ट्र पोलिसांची…’
Raj Thackeray On Badlapur School Case : राज ठाकरे म्हणाले की, बदलापूरची घटना भयावह आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना 12 तास का लागले, असा सवाल त्यांनी केला.
मुंबई :- बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेवर Badlapur School Case मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बदलापूर शाळेतील घटना भयावह आहे. या घटनेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना 12 तास का लागले, असा सवाल त्यांनी केला. एकीकडे कायद्याचे राज्य आणि दुसरीकडे पोलिसांचा हा कसला हलगर्जीपणा? मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एन्काऊंटरची मागणी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरणाचे आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्टवर लिहिले आहे की,बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संतप्त नागरिकांनी मंगळवारी बदलापूर बंदची घोषणा केली. एवढेच नाही तर बदलापूर स्थानकावरून जाणाऱ्या गाड्याही लोकांनी रोखल्या. बदलापूर स्थानकावर लोकांच्या जमावाने ट्रॅकवर ठिय्या मांडला. ही बाब समोर आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकासह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.