मुंबईठाणे
Trending

Raj Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राज ठाकरेंचे भावनिक ट्वीट; ‘अस्मिता चोरणाऱ्यांना’ फटकारले

Raj Thackeray Balasaheb Thackeray Tweet : ‘व्होटबँक म्हणून नव्हे, तर अस्मितेसाठी हिंदुत्व जपले’; प्रबोधनकार आणि बाळासाहेबांच्या विचारांवर दिला जोर

मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी आपल्या काकांच्या आठवणींना उजाळा देत एक महत्त्वपूर्ण फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकत, त्यांच्या विचारांवरून राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.

राज ठाकरे यांचे मत

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे वर्णन करताना म्हटले आहे की, “देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब.” त्याचप्रमाणे, भारतीय जनता पक्षाचा ‘कमंडलवाद’ फोफावण्यापूर्वी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारेही बाळासाहेबच होते, असे त्यांनी नमूद केले.

‘व्होटबँक’ नव्हे, ‘अस्मिता’

राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेबांनी कधीही हिंदूंकडे ‘व्होटबँक’ म्हणून पाहिले नाही, तर त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा आणि धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. “हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही… त्यामुळे त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

‘वारस’ मिरवणाऱ्यांना टोला

बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे ‘वारस’ म्हणून मिरवणाऱ्यांना किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांना राज ठाकरे यांनी टोला लगावला. ते म्हणाले, “त्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत… त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्याची पुसटशी देखील कल्पना नाही!”

राजकारणाचे सूत्र

आज केवळ मतं आणि सत्ता मिळवणे हेच राजकारण रूढ होत असताना, बाळासाहेबांनी ‘समाजकारण आधी आणि मग राजकारण’ हे आमच्या विचारात रुजवले, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांनी आपल्या काकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0