मुंबई

Raj Thackeray: राज ठाकरेंची नाराजी! ‘ठाकरेंचा सेवक…’ बॅनर मनसेने तात्काळ उतरवले

Raj Thackeray React On Banner : ‘सेवक’ शब्दावर आक्षेप; राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर कारवाई, किशोरी पेडणेकरांचीही प्रतिक्रिया

मुंबई :- राजधानी मुंबईत शिवसेना भवन आणि मनसेप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांच्या निवासस्थानाजवळ होणारी बॅनरबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच मनसेच्या एका कार्यकर्त्याने लावलेले “ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक” असे बॅनर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आवडले नसल्याने त्यांनी ते तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार Yashwant Killedar यांनी हे बॅनर उतरवले आहेत.

‘सेवक’ शब्दावर आक्षेप

कुर्ला येथील मनसैनिक लक्की वामन कर्डक यांनी लावलेल्या या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित जुना फोटो वापरला होता. मात्र, बॅनरवरील “ठाकरेंचा सेवक…” या शब्दावर राज ठाकरे यांचा आक्षेप होता. यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्ते अनेकदा उत्साहापोटी किंवा प्रसिद्धीसाठी असे बॅनर लावतात, जी पक्षाची अधिकृत भूमिका नसते. राज ठाकरेंच्या सूचनेनंतर हे बॅनर त्वरित काढण्यात आले आहेत.

किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “ते पोस्टर कोणी लावले होते आणि त्यांनीच ते काढले असेल तर त्यावर त्यांनाच विचारले पाहिजे.”

युतीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उमेदवारांना फॉर्म वाटप करण्यापूर्वी युती व्हायला हवी आणि दोन नेते (उद्धव आणि राज ठाकरे) युती कधी करायची, हे लवकर ठरवतील. तसेच, कोणाला तिकीट द्यायचे हे दोन ठाकरेंना ठरवू द्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महिला आरक्षणावर टीका

पेडणेकर यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हटले की, “महिलांसोबत बनवावनवी शिंदेंच्या पक्षाकडून केली जाईल, जशी 1500 रुपये दिले.” महापालिकेच्या आरक्षण लॉटरीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “पारदर्शक लॉटरी निघाली, अनेक लोकांना फटका बसला याचे आम्हाला वाईट वाटते. आशिष चेंबूरकर आहे, रवी राजा यांचा सुद्धा वॉर्ड आहे, त्यामुळे याबाबत पक्ष निर्णय घेईल.”

राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर मनसेने हे बॅनर त्वरित हटवले असले तरी, या घटनेमुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चा आणि त्यातील राजकीय अटी अधिक स्पष्ट झाल्या आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

35 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago