Raj Thackeray : गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरून धडधडणार

Raj Thackeray Padwa Sabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळावा 30 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याला मुंबई महापालिकेने मान्यता दिली आहे.
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याच्या मेळाव्या 30 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. Raj Thackeray Padwa Mela Sabha या मेळाव्याला मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाने मान्यता दिली आहे.जाहीर सभेत राज्यभरातून मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.या सभेला राज ठाकरे पक्ष संघटना आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली मते मांडू शकतात. या विशाल जाहीर सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मोठ्या संख्येने राज ठाकरे यांना ऐकण्याकरिता येत असतात त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंच्या या सभेला प्रचंड गर्दी जमण्याची शक्यता आहे. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त येथे मेळावा भरवला जातो. नागपूर हिंसाचार आणि महाराष्ट्र एमएलसी निवडणुकीवरही राज ठाकरे बोलू शकतात.
हा कार्यक्रम होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अखेर प्रशासनाने परवानगी दिली. आता यासाठी मोठ्या स्तरावर तयारी केली जाणार आहे.आता यासाठी मोठ्या स्तरावर तयारी केली जाणार आहे. मराठी नववर्षानिमित्त मनसेतर्फे दरवर्षी पाडवा मेळावा आयोजित केला जातो. मनसे कार्यकर्त्यांसाठी हा मेळा मुख्य आकर्षण असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे महत्त्वाचे पाहिले जात आहे. भाषणातून राज ठाकरे आपल्या पक्षाचे नवी दिशा ठरवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरेंची तोफ यंदाच्या पाडव्याच्या मेळाव्यातून कोणावर टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.