महाराष्ट्र

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान, ‘तर मी तयार आहे…’

Raj Thackeray On Uddhav Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जर आपल्याला एकत्र यावे लागले तर मी त्यासाठी तयार आहे, असे ते म्हणाले.

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांनी त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक मोठे विधान केले. Raj Thackeray On Uddhav Thackeray ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंशी माझे राजकीय मतभेद असू शकतात, पण जर महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला एकत्र यावे लागले तर मी त्यासाठी तयार आहे.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले होते?
“एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही (एकनाथ शिंदेंच्या बंडासारखं) तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टाळी दिली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

19 hours ago