ठाणे

Raj Thackeray : तलवार उंचावल्याप्रकरणी राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात हजर राहणार! – एप्रिल 2022 मधील ‘उत्तर सभे’तील घटनेची सुनावणी

•मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

ठाणे :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज (गुरुवार, 11 डिसेंबर) ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. ठाण्यातील एका सभेदरम्यान व्यासपीठावर तलवार उंचावल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी ते न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.

गुन्हा दाखल होण्याचे कारण

एप्रिल 2022 मध्ये राज ठाकरे यांनी ठाण्यात ‘उत्तर सभा’ घेतली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील चौकात पार पडलेल्या या सभेमध्ये राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना तलवार भेट दिली होती. यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपीठावर तलवार म्यानातून काढून हवेत उंचावली होती.

या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह एकूण 7 ते 8 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज (गुरुवार) या खटल्याच्या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर राहणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0