मुंबई

Raj Thackeray : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विटकरत व्यक्त केल्या भावना

Raj Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कविताच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे

मुंबई :- 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Sindhudurga मोठ्या उत्साहात भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. ही घटना पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी देखील या घटनेवरून सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत कवितातून सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी‌ महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ?

आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.
मध्यरात्र उलटल्यावर….शहरातील पाच पुतळे…एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले ….ज्योतिबा म्हणाले…शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा…शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा…आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त,…..चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,…तरी तुम्ही भाग्यवान…एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे…
माझ्या पाठीशी मात्र….फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0